Gold Price l गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या (Gold-Silver) दरात मोठी वाढ झाली होती. होळीपर्यंत सोने 90 हजार रुपयांपर्यंत पोहोचेल की काय, अशी भीती वाटत होती. चार दिवसांपूर्वी सोने 88 हजार रुपयांवर पोहोचले आणि नंतर थोडे खाली आले. मात्र, मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी, 1 मार्च 2025 रोजी सोन्याच्या (Gold) दरात घसरण झाली आहे, जी सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे.
सोन्याच्या दरात घसरण :
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या (Gold) दरात घट झाली आहे. शनिवारी, सोन्याच्या (Gold) दरात 500 रुपयांची घट झाली, तर 22 कॅरेट सोन्याच्या (22 Carat Gold) दरात 450 रुपयांची घट झाली. देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा (24 Carat Gold) दर 86,800 रुपयांच्या आसपास आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा (22 Carat Gold) दर 79,500 रुपयांच्या आसपास आहे. एक किलो चांदीचा दर 96,900 रुपये आहे.
डॉलरच्या (Dollar) मजबुतीमुळे सोन्याच्या (Gold) दरावर परिणाम झाला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मेक्सिको (Mexico) आणि कॅनडावर (Canada) शुल्क लावण्याची घोषणा केल्याने डॉलरचे (Dollar) मूल्य वाढले, ज्यामुळे सराफा बाजारात मंदी आली. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (American Federal Reserve) व्याजदर कपात पुढे ढकलण्याची शक्यता असल्याने सोन्याची (Gold) मागणी कमी झाली आहे.
महागाई वाढल्यामुळे लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे कमी उरतात, शेअर बाजार (Share Market) कोसळत असल्याने सोन्यात (Gold) गुंतवणूक करत होते, या सर्व गोष्टींचा परिणाम सोन्याच्या (Gold) किमतीवर होत आहे. जागतिक बाजारातील वाढता आर्थिक दबाव आणि गुंतवणूकदारांची सावधगिरी यामुळे सोन्याच्या (Gold) दरात घट झाली आहे.
दिल्लीत (Delhi), 24 कॅरेट सोन्याच्या (24 Carat Gold) दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. 22 कॅरेट सोन्याचा (22 Carat Gold) दर प्रति 10 ग्रॅम 79,740 रुपये होता, तर 24 कॅरेट सोन्याचा (24 Carat Gold) दर 86,800 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिला. मुंबईत (Mumbai), 22 कॅरेट सोन्याचा (22 Carat Gold) दर 79,590 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा (24 Carat Gold) दर 86,830 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. चांदीचा दर 96,900 रुपये प्रति किलो होता, त्यात 1000 रुपयांची घसरण झाली आहे.
गेल्या सहा महिन्यांतील स्थिती :
ऑक्टोबर महिन्यात सोन्याच्या (Gold) दरात 5.5% पेक्षा अधिक वाढ झाली होती. नोव्हेंबर महिन्यात सोन्याचे दर 3.5% नी घसरले. डिसेंबर महिन्यात सोन्या-चांदीच्या (Gold-Silver) दरात थोडी घसरण झाली, पण फारसा दिलासा मिळाला नाही. नवीन वर्षात, जानेवारी महिन्यात सोन्याचा (Gold) दर 8.11% नी वाढला, तर फेब्रुवारी महिन्यात 2.5% दरवाढ झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती, सरकारी कर आणि रुपयाच्या मूल्यातील बदल यामुळे भारतातील सोन्याच्या (Gold) किमतीत फरक पडतो. सोने (Gold) हे केवळ गुंतवणुकीचे साधन नसून ते आपल्या परंपरा आणि सणांचा महत्त्वाचा भाग आहे.