बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे आजचा भाव

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होत आहे. त्याचा थेट परिणाम आता भारतीय बाजारावर देखील होताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी पडझड पहायला मिळत आहे. त्याबरोबर चांदीच्या किंमती देखील घसरल्या आहेत.

या आठवड्यात नफा वसुलीने सोने आणि चांदीला मोठा फटका बसला आहे. जागतिक बाजारात चालू असलेल्या घडामोडींचा थेट परिणाम कमोडिटी मार्केटवर पडताना दिसतोय. त्यामुळे या आठवड्यात सोन्याचा भाव पुन्हा 47 हजाराच्या खाली घसरला आहे.काल पुन्हा सोन्याच्या भावात 106 रूपयांची घसरण होऊन सोन्याचा भाव प्रतितोळा 47783 वर स्थिरावला आहे. त्याआधी कमोडिटी मार्केट खाली गेले असताना सोन्याचा भाव 47,771 पर्यंत खाली आला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी होत राहिल्या तर येत्या काळात सोनं आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरात देखील मोठी घसरण होताना दिसतेय. मंगळवारी चांदीच्या दरात 82 रूपयांची घट झाली. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव 68281 रुपयांपर्यंत खाली आला आहे.

दरम्यान, सोन्याचा दर गेल्या 2 महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर गेल्या आर्थिक वर्षात अनेकांनी गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे मागील वर्षात गोल्ड ईटीएफमध्ये 6900 कोटीची गुंतवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. तर येत्या काळात सोन्याच्या किंमती पुन्हा 52 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

राज कुंद्रा प्रकरणातील एका नावामुळे मोठा गोंधळ, ‘या’ मराठी अभिनेत्याला झाला मनस्ताप

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार- राजेश टोपे

‘तो कंटेट वल्गर होता, पण…’; राज कुंद्राच्या वकीलांचं स्टेटमेंट समोर

‘कोरोना जोपर्यंत संपणार नाही, तोपर्यंत जेवणार नाही’; मंत्र्यानं केला मोठा निश्चय

‘देशात ऑक्सिजनअभावी अनेकांना जीव गमवावा लागला ‘; गडकरींचा व्हिडीओ व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More