मुंबई | कोरोना काळानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर सोन्याच्या दरात एका महिन्यानंतर घसरण झाली आहे.
मल्टीकमॉडिटी एक्सचेंजवर आज सोने-चांदीच्या दरात 144 रूपयांची घसरण झाली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये गोल्ड रेट कमी झाल्यानं आज भारतीय बाजारतही सोने-चांदीचा दर स्वस्त झाला आहे. मागील काही दिवसांपासून सोने दरात सतत घसरण होत आहे. मागील पाच दिवसांत सोने दरात जवळपास 4000 रूपयांची कमी झाली आहे.
आज MCX वर सोन्याचा भाव 144 रूपयांनी कमी होऊन 51420 रूपयांनवर पोहोचला आहे. चांदीचा भाव आज 372 रूपयांनी कमी झाला असून, या घसरणीसह चांदीचा भाव 67953 रूपये प्रती किलो ग्रॅम आहे. एक महिन्यानंतर चांदीचा भाव 68000 रूपयांनी खाली आला आहे.
दरम्यान, आता गुंतवणुकदार सोन्याऐवजी बाजारात गुंतवणूक करत असल्यानं याचा परिणाम सोने चांदीच्या दरात होत आहे. क्रुड ऑइलचा भावही काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे शेअर बाजारात तेजीचं वातावरण पहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या-
‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना नरेंद्र मोदींनी सुनावलं, म्हणाले…
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचं जगाला भावनिक आवाहन, म्हणाले…
सकाळचा चहा ठरू शकतो घातक, वाचा ‘हे’ गंभीर परिणाम
IPL खेळाडूंसाठी आणलेल्या बसेस मनसेने फोडल्या, वाचा काय आहे प्रकरण?
तळीरामांसाठी आनंदाची बातमी! सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
Comments are closed.