बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्याचा भाव आज पुन्हा उतरला, वाचा ताजे दर

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. या आठवड्यात सोने बाजारात मोठी पडझड अनुभवायला मिळाली आहे. तसेच आज देखील सोन्या-चांदीचे दर घसरले आहेत. आज प्रती तोळा सोन्यामागे 100 रुपयांची घट झाली आहे. 100 रुपयांच्या घटीसह आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव 47 हजार 120 रुपये प्रती तोळ्यावर आले आहेत.

सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात आज क्षुल्लक वाढ झाली आहे. आज प्रती किलो चांदीमागे 200 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या एमसीएक्सवर चांदीचा दर 67 हजार 800 रुपये प्रती किलो आहे.

सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोनं घालून मिरवणं एवढंच नव्हे, तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देतात. अलीकडे काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! मुंबईत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या रूग्णाचे डोळे उंदराने कुरतडले

पैज लावून सांगतो देशात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही- राकेश झुनझुनवाला

सरकार कोरोनाला नाही तर विरोधकांना घाबरत आहे- चंंद्रकांत पाटील

‘कॉलेज आणि विद्यापीठात मोदींचे आभार मानणारे फलक लावावेत’; युजीसीकडून विद्यापीठांना निर्देश

राहुल गांधींचा मोदी सरकारवर टीकेसाठी नाहीतर मदतीसाठी हात पुढे; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More