बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, तर चांदीच्या दरात झाली वाढ

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या दरामध्ये घसरण होत असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यातच आज सोन्याच्या दरांमध्ये घसरण झाली असून चांदीचा दर मात्र वाढला आहे. कोरोनामुळे भारताची अर्थव्यवस्था डगमगली असतानाच परकीय चलनाच्या गंगाजळीत घट झाल्याने सोन्याच्या किमतीला त्याचा थेट फटका बसला आहे.

दरम्यान, भारतात असलेल्या परकीय चलनाच्या भांडारातील पाउंड, युरो आणि येन या चलनांच्या विनिमय दरात चढ-उतार होत असल्याने यापूर्वीच फोरेक्स रीजर्वमध्ये वाढ झाली होती. परकीय गुंतवणूकदारांनी कोरोना काळातही भारतावर विश्वास ठेवल्याने भारताची गंगाजळी ही 600 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचली होती.

शुक्रवारी सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घट झाली असून चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. दिल्लीतील बाजारानुसार सोन्याच्या किमतीत 66 रुपये प्रति ग्राम घसरण झाली असून चांदीच्या किमतीत प्रति किलो गुरुवारी मात्र 332 रुपयांची वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा प्रति तोळा दर हा 46 हजार 309 रुपयांवर गेला आहे. मागच्या वर्षी कोरोनाकाळात सोन्याने आतापर्यंतचा सर्वोच्च उच्चांक गाठला होता. त्यानंतर हळूहळू सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचं दिसून आलं.

थोडक्यात बातम्या –

पुढच्यावेळी पुणे- मुंबई महामार्ग उखडून टाकू- रविंद्र भेगडे

चिंता वाढली! देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजारांच्या पुढेच

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहराच्या अडचणीत वाढ!

…तर मी राजकीय संन्यास घेईल- देवेंद्र फडणवीस

“सरकार प्रत्येक गोष्टीत मोदींकडे बोट दाखवतं, बायकांनी मारलं तरी ते मोदीजींनी केलं म्हणतील”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More