Top News देश

तीन दिवसात दोनदा घसरले सोन्याचे भाव; आज काय आहे किंमत???

नवी दिल्ली | यंदा वर्षाच्या सुरूवातीला गेल्या तीन दिवसात सोन्याचे भाव दोनदा घसरले आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारीच्या सोन्याचा वायदा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 0.03 टक्क्यांनी कमी झाला आहे तर सोन्यासारखे चांदीचे दरही कमी झाले आहेत.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज फेब्रुवारीच्या सोन्याचा वायदा भाव 14 रुपयांनी घसरून 49,328 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. चांदीची किंमत 155 रुपयांनी घसरून 65,400 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आज सोन्याचा भाव वाढल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र डॉलरच्या मजबुतीमुळे तेजी पाहायला मिळत नाही.

दरम्यान, दिल्लीतील सराफा बाजारात सोने 389 रुपयांनी वाढून 48866 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालं. तर मागच्या सत्रात सोने 48477 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘शेतकरी आंदोलन फसवे, आता हे नाटक बंद झाले पाहिजे’; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

सरकारनं सुरक्षा काढली; मनसेनं स्थापन केलं स्वतःचं सुरक्षा पथक!

त्यांनी मुख्य हायवेने न जाता शाॅर्टकट घेतला आणि तिथंच घात झाला!

कौतुकास्पद! चौथीपर्यंत शिकलेल्या आजोबांनी तयार केली 4 भाषांमध्ये डिक्शनरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या