बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

पुणे | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कौल असतो. त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं. भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

गेले काही दिवस सोन्याच्या दरात सतत चढउतार पाहायला मिळाला आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली आहे. आज पुण्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 560 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला आहे.

सोन्याबरोबरंच चांदीच्या दरात देखील आज पुन्हा वाढ पाहायला मिळाली आहे. आज पुण्यातील सराफा बाजारात प्रती किलो चांदीमागे 800 रुपयांची वाढ झाली आहे. 800 रुपयांच्या वाढीसह आज चांदीचा दर 67 हजार 200 रुपये प्रती किलोवर बंद झाला आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या-

“राज कुंद्रा मला किस करत म्हणाला, माझे शिल्पाचे संंबंध ठीक नाहीत”

‘अजित पवारांनी भाषेबाबत बोलणं म्हणजे राज कुंद्राने…’; नितेश राणेंची जोरदार टीका

नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत- भास्कर जाधव

चिपळूण दौऱ्यावेळी अधिकाऱ्यांना झापत, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राणेंना अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

भाजप-मनसे एकत्र येणार का?; राज ठाकरे म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More