बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्या-चांदीच्या दरात आज देखील मोठी घसरण, पटापट तपासा ताजे दर

नवी दिल्ली | कोणताही सण म्हटलं की सोनं खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते. एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देत आहेत. भारतात सोन्याची वाढती मागणी पाहता गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. अशातच अलिकडे सोन्याच्या दरात मोठी पडझड पाहायला मिळत आहे.

आज दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावात तब्बल  451 रुपयांची घसरण झाली आहे. 451 रुपयांच्या घसरणीसह आज दिल्लीत सोन्याचा दर 46 हजार 844 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला आहे. दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी हेच दर 47 हजार 295 रुपये प्रती तोळा होते.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरात देखील आज मोठी घट अनुभवायला मिळाली आहे. आज चांदीच्या दरामध्ये 559 रुपयांची घसरण झाली आहे. 559 रुपयांंच्या घसरणीसह चांदीचा भाव आज 67 हजार 465 रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या –

शाहिद कपूरच्या बायकोची ऑनलाईन फसवणूक; फोटो शेअर करत म्हणाली…

“55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री झाला, 50 नगरसेवकांमध्ये पिंपरी चिंचवडचा महापौर का होणार नाही?”

“मला आणि कराडांना गोपीनाथ मुंडेंनीच घडवलं, आम्ही साहेबांचेच कार्यकर्ते”

खुशखबर! आता पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त होणार? जाणून घ्या काय आहे कारण

“मोदी सरकारने देश उध्वस्त करायचं ठरवलं असेल तर काय करणार?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More