मुंबई | आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होतांना दिसत आहे. त्याचा थेट परिणाम आता भारतीय बाजारावर देखील होताना दिसत आहे. अशातच रशिया-युक्रेन युद्धाचाही आंतराराष्ट्रीय बाजारावर मोठा परिणाम झालेला पहायला मिळत आहे.
सोने खरेदीचा विचार असेल तर ही सुवर्णसंधी. सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने वायदे भाव 0.3 टक्क्यांनी घसरुन 52,712 रुपये प्रति 10 ग्रॅमवरआला आहे.
तर चांदीचा भाव 0.6 टक्क्यांनी घसरुन 69970 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात तेजी पाहायला मिळाली होती.
दरम्यान, एक उत्तम गुंतवणुक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे भारतात सोन्यावर विशेष प्रेम असलेलं पहायला मिळतं. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत.
थोडक्यात बातम्या –
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! कोरोनाबाबत ‘ही’ अपडेट आली समोर
सरकारची भन्नाट योजना, ‘इतक्या’ वर्षात तुमचे पैसे होतील डबल
देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…
आनंदाची बातमी! आता फक्त ‘इतक्या’ रूपयात मिळेल गॅस सिलेंडर
“नितेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेलं पिल्लू”
Comments are closed.