बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, वाचा ताजे दर

मुंबई | कोरोनामुळे निर्माण झालेल्या या आर्थिक मंदीच्या काळात सोन्या चांदीच्या (Gold Silver) दरांमध्ये चढउतार पहायला मिळाले. उत्तम गुंतवणुकीसाठी भारतात सोन्याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे भारतात सोन्या-चांदीचे भाव गरम असलेले पहायला मिळतात.

आज सोन्याच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावामुळे मंगळवारी सोने-चांदी दरात (Gold-Silver Rate) घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने आणि चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.

सोन्याचा वायदे भाव 198 रुपयांनी कमी होऊन 51,373 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. हा भाव 24 कॅरेट सोन्याचा आहे. याआधी सोन्याचा भाव बाजारात 51,342 च्या रेटवर ओपन झाला होता.

चांदी वायदे भाव 199 रुपयांच्या नुकसानासह 67,906 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. चांदीचा भाव सकाळी 67,890 वर ओपन झाला होता.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी ! मुंबई महापालिकेकडून नारायण राणेंना मोठा दिलासा

अनिल देशमुख पुन्हा गृहमंत्री होणार?, ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

“राज्यात कितीही बिकट परिस्थिती आली तरीही वीज पुरवठा थांबणार नाही”

“हिंदुंच्या सणाला परवानगी देताना यांच्या हाताला लकवा मारतो का?”

Russia Ukrain War | रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचं ‘हे’ शहर उद्ध्वस्त, इतक्या लोकांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More