Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा ताजे दर
नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. या युद्धाचा अनेक गोष्टींवर परिणाम झालेला पहायला मिळाला. युद्धामुळे तर महागाईचा भडकाच उडाला आहे. अशातच आंतरराष्ट्रीय बाजारावरही याचा थेट परिणाम पहायला मिळाला.
आता 24 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 54 हजारांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 49,400 इतका आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे भारतीय बाजारातही MCX वर सोन्याचा वायदे भाव 1.8 टक्क्यांच्या तेजीसह 53,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
दरम्यान, आपल्या भारत देशात सोन्याला खूपच महत्त्व आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांना. त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पहायला मिळतं असतो.
थोडक्यात बातम्या –
‘..तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहिल’, पुतिन यांचा युक्रेनला थेट इशारा
“…म्हणून शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर राग आहे”
“राज्यपालांना इथून हटवणं एका मिनिटाचं काम आहे”
मोठी बातमी! मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज
“निकाला आधीच मी येणार, मी येणार सांगत होते, पण आम्ही काय येऊ देतो”
Comments are closed.