Gold Rate | सोन्याचा दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा आजचे ताजे दर
मुंबई | रशिया आणि यूक्रेन यांच्यामधील वाढलेल्या तणावामुळे सोन्याच्या दरात खूप वाढ झाली आहे. 13 महिन्यानंतर पुन्हा सोन्याचे भाव वाढलेले आहेत. वायदे बाजारात पुन्हा सोन्याचा दर 50 हजार प्रति तोळेवर जाऊन पोहचला आहे.
मुंबईतील आजचा सोन्याचा भाव हा 24 कॅरेट 51060 रूपये प्रति तोळे झाला आहे. दरम्यान, चांदीच्या दरात आज मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आज बाजारात एक किलो चांदीसाठी एक हजार रूपये मोजावे लागतात. डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे सोने चांदीचे दर वाढले आहेत.
गुंतवणूकदारांना गेल्या वर्षांत सोन्याच्या गुंतवणूकीत फारसा फायदा झाला नाही. आज बाजारात सोन्याच्या दरात तीनशे रूपयांची वाढ झालेली आहे. यामुळे सोन्याचा भाव पन्नास हजारांहून अधिक झाला आहे.
दरम्यान, रशिया युक्रेन यांच्यामधील युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार धोक्याच्या किंवा जोखमीच्या गुंतवणीकीतून पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे धाव घेतल्याचं दिसत आहे.
थोडक्यात बातम्या –
“किरीट सोमय्यांचे आरोप हे TV वर येणाऱ्या जाहिरातींसारखे”
“दादा आपण आत्ताच आपली पब्लिसिटी करु कारण 3 नंतर संजय राऊत सगळे चॅनल टेक ओव्हर करतील”
पत्रकार परिषदेआधी संजय राऊतांचा माध्यमांशी संवाद, म्हणाले…
“आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश, उद्या शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र बोलणार”
बीडमध्ये धनंजय मुंडेंना धक्का, तर पंकजा मुंडे ठरल्या ‘किंग’
Comments are closed.