बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Gold Rate: लग्नसराईत स्वस्त सोने खरेदीची संधी, जाणून घ्या नवे दर

मुंबई | लग्नाच्या हंगामात भारतात सोन्याला मोठी मागणी असते. या लग्नसराईत तुम्हाला सोने-चांदी (Gold-silver) खरेदी (Gold Rate Today) करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. सोन्याच्या तसेच चांदीच्या किंमतीत देखील घट (Gold Price Down) झाल्याचं पहायला मिळत आहे. डिसेंबरच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घट झाल्याने आता सोनं खरेदी करण्याकडे लोकांचा ओघ दिसत आहे.

सोमवारी सोन्याच्या दरात 302 रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे भारतीय दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा भाव 46,848 रूपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. एचडीएफ सिक्युरिटीच्यानुसार रूपयाची घसरण हे त्याच्या मागचे कारण आहे. मागील व्यापारात दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा भाव 47,150 रूपये प्रति 10 ग्रॅम होता.

चांदीच्या किंमतीत (Silver Rates Today) सुद्धा आज 81 रूपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे आज दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 63,031 प्रति किलो झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवली गेली. तर चांदीचा दर चांदी दर देखील खाली गेल्याचं पहायला मिळालं.

दरम्यान, कोरोनाच्या ओमिक्राॅन व्हेरिएंटमुळे (Omicron variant) आता गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे सोन्याची मागणी देखील वाढणार आहे. परिणामी आगामी काळात सोनं महागण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रपतींच्या सहीसह कृषी कायदे रद्द, पण शेतकरी ‘या’ मागणीवर ठाम

“भाजप हा पक्ष जाता-जाता सर्वकाही विकून जाईल”

पेच नव्या संघनायकाचा! कोहलीनंतर ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर RCBची धुरा?

पुण्यात दिवसभर संततधार पाऊस; राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

“ममता बॅनर्जी जेव्हा सातवीत होत्या तेव्हा शरद पवार…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More