मुंबई | सोनं (Gold) म्हणजे भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. सोनं खरेदी करण्यासाठी भारतीय नेहमीच उस्तुक असेलेल पहायला मिळतात. एक उत्तम गुंतवणूक म्हणूनही सोनं खरेदीवर भर दिला जातो. त्यामुळे भारतीयांचा सोनं खरेदी करण्याकडे मोठा कल आहे. अशातच सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो.
सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळत असताना आज सोन्याच्या दरात वाढ पहायला मिळाली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, गुरुवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 661 रुपयांनी वाढून 51,271 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
आजच्या व्यवहारात सकाळी सोने 50,921 रुपयांवर उघडले आणि अल्पावधीतच 1.31 टक्क्यांच्या वाढीसह 51 हजारांची पातळी ओलांडली. चांदी 62,348 रुपयांवर उघडली आणि लवकरच 2.38 टक्क्यांनी वाढून 63,840 रुपयांवर पोहोचली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदी दरांमध्ये चढउतार पहायला मिळत आहे. या आठवड्यातही सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
“मशिदींवरील भोंगे काढायला सांगितले म्हणून हिरव्या उचक्या लागल्या”
“ज्यांच्यात क्षमता आहे असं वाटायचं त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचे राजकारण सुरू केलं”
“…तर MIM देखील गप्प बसणार नाही, बघू आम्हाला कोण थांबवतं”
पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी, 10वी उत्तीर्ण आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच
यंदाही चक्रीवादळ धडकणार, ‘या’ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा जारी
Comments are closed.