नवी दिल्ली | सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Price) रोज चढ-उतार होत असताना भारतीय सराफ बाजारात सोमवारी सोने-चांदी स्वस्त झालं आहे. सोन्यासह (Gold) आज चांदीच्या (Silver) दरात देखील मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोनं 116 रूपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या दरात देखील 173 रूपयांची घसरण झाली आहे. आजच्या घसरणीनंतर सोनं 51,228 रूपयांवर ट्रेड करत आहे.
सोमवारी प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,650 रूपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 48,263 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत. आज बाजारात 18 कॅरेट सोन्याचा भाव 39,488 रूपये इतका आहे.
दरम्यान, 24 कॅरेट सोनं 99.9 टक्के शुद्ध असतं. तर 22 कॅरेट सोनं 91 टक्के शुद्ध असून त्यात 9 टक्के इतर धातू असतात. 24 कॅरेट सोन्यात कोणत्याही प्रकारची भेसळ नसल्याने 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत फरक पडतो.
थोडक्यात बातम्या-
Sujay Vikhe: “… तर मग आम्ही एका मिनिटात पलटी मारू”
कडक उन्हात तहानलेल्या माकडासाठी पोलीस कर्मचारी ठरला देवदूत, पाहा व्हिडीओ
सरकारची भन्नाट योजना! फक्त 250 रूपये भरून सुरक्षित करा मुलीचं भविष्य
उष्णतेचा कहर! उष्मघातामुळे राज्यात 3 जणांचा मृत्यू
अत्यंत धक्कादायक; कीवमध्ये सापडले तब्बल ‘इतके’ मृतदेह
Comments are closed.