Gold-Silver Price Today | ऐन लग्नसराईत खरेदीवर ग्राहकांचा खिसा रिकामा होईल, असं दिसत आहे. आज सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात सोने-चांदीचे वायदे पुन्हा एकदा तेजीने सुसाट धावत आहेत. आज सोन्या आणि चांदीच्या वायदे भावात वाढ नोंदवली गेली असून दोन्ही मौल्यवान धातूंच्या फ्युचर्स किमती आज तेजीत व्यवहार करताना दिसत आहेत. सोन्याचे फ्युचर्सचे 62, 500 रुपयांपर्यंत वाढले असताना चांदीचे वायदे 74,600 रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावातही वाढ होण्याची शक्यता आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा फेब्रुवारी वायदा आज 59 रुपयांनी वाढून 62, 525 रूपयांवर खुला तर यावेळी दिवसभरातील उच्चांक 62, 546 रुपये आणि दिवसाचा नीचांक 62, 500 रुपयांवर आला.
Gold-Silver Price Today सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओद्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असं लिहिलं आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.
Gold-Silver Price Today | 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सोने अंदाजे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने आलिशान असले तरी ते दागिने बनवता येत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
Gold-Silver Price Today | मिस्ड कॉलवरून किंमत जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी, तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. काही वेळात एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील. याशिवाय, सतत अपडेट्सच्या (Gold-Silver Price Today) माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.
महत्त्वाच्या बातम्या-
Devendra Fadnavis | महायुतीत वादाची ठिणगी?; फडणवीसांचा थेट अजित पवारांना इशारा
Rohit Sharma | गौतम गंभीरनं उडवली रोहित शर्माची खिल्ली
Karan-Tejasswi | करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!
IPL | न्यूझीलंडचा ‘हा’ खेळाडू तुमच्या संघात हवाच!, इरफान पठाणने कुणाला दिला मोलाचा सल्ला
Manoj Jarange | “मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, छगन भुजबळांचा कार्यक्रमच करतो”