बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्या-चांदीचे भाव पुन्हा उतरले, वाचा आजचे ताजे दर

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. काल सोने बाजारात मोठी पडझड अनुभवायला मिळाली आहे. तसेच आज देखील सोन्याचे दर घसरले आहेत. आज प्रती तोळा सोन्यामागे 60 रुपयांची घट झाली आहे. 60 रुपयांच्या घटीसह आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव 47 हजार 130 रुपये प्रती तोळ्यावर आले आहेत.

सोन्याच्या तुलनेत आज चांदीच्या दरात काहीशी वाढ अनुभवायला मिळाली आहे. आज प्रती किलो चांदीमागे 400 रुपयांची वाढझाली आहे. सध्या एमसीएक्सवर चांदीचा दर 68 हजार 300 रुपये प्रती किलो आहे.
सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो.

सोनं घालून मिरवणं एवढंच नव्हे, तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देतात. अलीकडे काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या- 

“खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत”

जवानानं धावत्या रेल्वेतून कोसळणाऱ्या प्रवाशाचे वाचवले प्राण, रेल्वेमंत्र्यांकडून कौतुकांचा वर्षाव

“करावं तसं भरावं, त्यामुळे राष्ट्रवादीने ईडीच्या कारवाईवर राजकारण करू नये”

“केंद्र सरकार आपल्या कर्तव्यात चुकल्यामुळेच ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलं”

रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा मैदानात! अमेरिकन पाॅप स्टार ब्रिटनी स्पीअर्सच्या स्वातंत्र्यची मागणी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More