बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्या-चांदीचे भाव पुन्हा उतरले, वाचा आजचे ताजे दर

मुंबई | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कौल आहे. भारतातील लोकांला सोन्याच्या असलेल्या आवडीमुळे भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

मंगळवारी वायदे बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. सोमवारी एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याचा बाजार 48 हजार 760 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला होता. मंगळवारी हाच दर 48 हजार 600 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला आहे. अशाप्रकारे मंगळवारी सोन्याच्या दरात 160 रुपयांची घट पाहायला मिळाली आहे.

चांंदीच्या दरात देखील मंगळवारी हलकिशी घट अनुभवायला मिळाली आहे. सोमवारी एमसीेएक्सवर चांदीचा दर 71 हजार 900 रुपये प्रती तोळा होता. मंगळवारी हाच चांदीचा भाव 400 रुपयांच्या घटीसह 71 हजार 500 रुपये प्रती किलोवर बंद झाला आहे.

दरम्यान, मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांश वेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातो. या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या- 

“भाजप आणि आरएसएसने श्रीरामांच्या नावावर वर्गणी गोळा करण्याचा धंदा चालवलाय”

निलेश राणे आणि संजय काकडेंनी तब्बल इतक्या लाखांची पाणीपट्टी थकवली, पुणे महापालिकेने धाडली नोटीस

आनंदाची बातमी! अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं

‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली ट्रोल

‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More