बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनं-चांदी दरात घसरण; वाचा आजचे ताजे दर

नवी दिल्ली | नवीन वर्षाच्या मुहुर्तावर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होतांना दिसत आहे.  त्याचा थेट परिणाम आता भारतीय बाजारावर देखील होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी पडझड पहायला मिळत आहे. त्याबरोबर चांदीच्या किंमती देखील घसरल्या आहेत.

IBJA नुसार सोन्याच्या दराची सुरुवात आज प्रति दहा ग्रॅममागे 47838 रुपयांनी झाली. त्यात 38 रुपयांची घसरण पहायला मिळाली. चांदीच्या दरातही आज घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या दराची सुरुवात सकाळी प्रति किलोमागे 61096 रुपयांनी झाली होती.

नवीन वर्षात सोनं खरेदी करण्यासाठी चांगली संधी असल्याचं पहायला मिळत आहे. सोनं-चांदीचे दर कमी झाल्यामुळे आता सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे.

सोनं (Gold) हा भारतीयांसाठी जिव्हळ्याचा विषय. एक उत्तम गुंतवणुक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे भारतात सोन्यावर विशेष प्रेम असलेलं पहायला मिळतं. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“…तर मला वाटतं मी माझा वेळ वाया घालवत आहे”, ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

राणे सगळ्यांना पुरुन उरणारे आहेत – चंद्रकांत पाटील

‘याचं नाव घ्या आणि त्याचं नाव घ्या, लग्न बिघ्न आहे का माझं?’; अजित पवार संतापले

“पंतप्रधान मोदी मास्क लावत नाही म्हणून लोकही मास्क लावत नाहीत”

Corona: ‘मुंबईच्या बाहेरुन येणारी लोकं शिस्त बिघडवतात’; किशोरी पेडणेकर भडकल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More