बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनं-चांदी दरात घसरण; वाचा आजचे ताजे दर

नवी दिल्ली | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी (Gold) करण्याकडे भारतीयांचा मोठा कल आहे, त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं.

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या(Gold, Silver Rate) दरात सातत्याने चढउतार होताना पाहायला मिळत आहे. या आठवड्यात सोने बाजारात मोठी पडझड अनुभवायला मिळाली आहे. तसेच आज देखील सोन्या-चांदीचे दर घसरले आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याच्या फेब्रुवारीसाठीच्या वायदे किमतीमध्ये 0.10 टक्क्यांची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे प्रति तोळा सोन्याचा दर आज 48,007 रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीच्या दरातही घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव 0.05 टक्क्यांनी घसरला आहे. या घसरणीनंतर चांदीचा भाव 61,593 रुपयांवर पोहोचला आहे.

थोडक्यात बातम्या – 

बिपीन रावत यांच्या अपघातापूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

CDS बिपीन रावतांच्या निधनावर पाकिस्तानने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

3 मिनीटांत 900 कर्मचाऱ्यांना काढून टाकणाऱ्या भारतीय CEOनं अखेर माफी मागितली, म्हणाले…

CDS जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर CDS पदासाठी ‘या’ मराठमोळ्या नावाची चर्चा

Omicronच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More