न्यू इयरला मिळाली आनंदवार्ता! सोनं झालं स्वस्त, पाहा आजचे दर

Gold-Silver Rate Today 1 January 2025

Gold-Silver Rate Today | नवीन वर्षाचा नवा सूर्य नवी ऊर्जा घेऊन आला आहे. जगभरात नवीन वर्षाचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुवर्णनगरी देखील उजळून निघाली आहे. सराफा बाजारात आज ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे. कारण, मौल्यवान धातू सोन्याने आज ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय. गेल्या वर्षात सोन्याने दरवाढीचे अनेक विक्रम केले. मात्र, यावर्षी तरी भाव खाली येतील, अशी आशा आता ग्राहकांना लागली आहे. (Gold-Silver Rate Today)

गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 63,353 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. तर 1 जुलै रोजी सोने थेट 71 हजारांच्या घरात पोहोचले. चांदीने देखील मागील वर्षी 78 ते 80 हजारांहून थेट 1 लाख 5 हजारांचा टप्पा गाठला. तर काल 31 डिसेंबर 2024 रोजी दोन्ही धातुत मोठी पडझड झाली. आज 1 जानेवारी 2025 रोजी सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आज चांदीने देखील आनंदवार्ता दिली आहे. गेल्या आठवड्यात चांदी 1,100 हजार रुपयांनी वधारली होती. तर 30 डिसेंबर रोजी चांदीत बदल दिसला नाही. काल 31 डिसेंबररोजी चांदीत 1900 रुपयांची घसरण दिसून आली. सध्या गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,162, 23 कॅरेट 75,857, 22 कॅरेट सोने 69,764 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,122 रुपये, 14 कॅरेट सोने 44,555 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 1 January 2025

महत्त्वाच्या बातम्या-

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज, गॅस सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

तरुणांनो नववर्षात रेल्वेत तब्बल ‘इतक्या’ जागा भरल्या जाणार; ‘असा’ करा लगेच अर्ज

वाल्मिक कराडला धक्का, केज कोर्टात झाला मोठा निर्णय!

नवीन वर्षाचा पहिला दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ!

मुंडेंच्या ‘त्या’ भेटीनंतर कराडचं शरणनाट्य, त्याला लपवून ठेवलं, मोठा खुलासा समोर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .