Gold-Silver Rate Today | सध्या सर्वत्र लग्नसराईची लगबग सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्यात चढउताराचे सत्र दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा सोन्याने आघाडी घेतली आहे. तर, चांदीचे भाव अद्यापही स्थिर आहेत. गेल्या आठवड्यात सोने 900 रुपयांनी उतरले. तर या सोमवारी 9 डिसेंबर रोजी सोन्यात 160 रुपयांची वाढ दिसली. (Gold-Silver Rate Today)
आज 10 डिसेंबररोजी सकाळच्या सत्रात देखील सोन्यात दरवाढ दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, गेल्या आठवड्यात चांदीत 500 रुपयांची घसरण दिसून आली.
5 डिसेंबर रोजी चांदी 1 हजारांनी महागली होती. त्यानंतर चांदीच्या किंमतीत मोठा बदल दिसला नाही. या आठवड्याच्या सुरुवातीलाही चांदीच्या किंमती जैसे थेच होत्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव-
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,692, 23 कॅरेट 75,385, 22 कॅरेट सोने 70,250 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 57,519 रुपये, 14 कॅरेट सोने 44,865 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )
सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)
News Title – Gold-Silver Rate Today 10 December 2024
महत्त्वाच्या बातम्या-
भाजप आमदाराच्या मामाचं अपहरण, नंतर हत्या! नेमकं काय घडलं
कुर्ला अपघातातील चालकाबाबत धक्कादायक खुलासा समोर!
ब्रेक फेल की… कुर्ल्यातील अपघातामागचं खरं कारण काय?
राजकीय वर्तुळात शोक, ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचं निधन