लग्नसराईत दागिने घ्यायचा विचार करताय?, पाहा लेटेस्ट 1 ते 10 ग्रॅम सोन्याचे दर

Gold Rate

Gold-Silver Rate Today | देशभरात सध्या विवाह सोहळयांची धूम आहे. भारतात लग्नसराईत लाखोंचा खर्च केला जातो. यामध्ये सोने-चांदीचे दागिने देखील मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. या नवीन वर्षाच्या अगदी पहिल्या दिवसापासून मौल्यवान धातू सोन्याने दरवाढीचा रंग दाखवलाय. आज 10 जानेवारीरोजी सोने आणि चांदीचे लेटेस्ट दर काय आहेत ते पाहुयात. (Gold-Silver Rate Today )

सोन्याने गेल्या आठवड्यात 1600 रुपयांची रॉकेट भरारी घेतली होती. तर गेल्या तीन दिवसात चांदीची किंमत स्थिर आहे.या सोमवार, मंगळवारी सोन्याचे भाव स्थिर होते. तर बुधवारी सोने 100 रुपयांनी तर गुरुवारी 380 रुपयांनी सोने महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. म्हणजेच सोनं पुन्हा एकदा 80 हजारांच्या जवळपास आलं आहे.

मागील आठवड्यात चांदी 3 जानेवारी रोजी 2 हजारांनी वधारली तर 4 जानेवारीला 1 हजारांनी स्वस्त झाली. या आठवड्यात सोमवारी चांदी 1 हजारांनी महाग झाली. तर या तीन दिवसांपासून या धातुत कोणताही बदल झालेला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचे दर

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,618, 23 कॅरेट 77,307, 22 कॅरेट सोने 71,098 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 58,214 रुपये, 14 कॅरेट सोने 45,407 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 10 January 2025

महत्त्वाच्या बातम्या-

भयंकर! वर्षभराच्या बाळासह कुटुंबातील 5 जणांची हत्या, नंतर मृतदेह गोणीत भरून…

आज पुत्रदा एकादशी, भगवान विष्णू ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादांनी मौन सोडले!

पुण्यातील मगरपट्टा ते एफसी रोड, आकाची संपत्ती किती?

वाल्मिक कराडवर ED ची कारवाई का होत नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .