गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 ग्रॅम सोनं फक्त…

Gold-Silver Rate Today | ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात सोन्याच्या दरात विक्रमी नोंद झाली होती. किमती तब्बल 75 हजारांच्या पार गेल्याचं दिसून आलं.

मात्र, आता ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय. सोन्याचे भाव मे महिन्याच्या विक्रमी उच्चांकावरून जवळपास 5 टक्क्यांनी घसरले आहेत. देशांतर्गत बाजारासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

सोन्याच्या दरात मोठी घसरण

सध्या देशांतर्गत बाजारात प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 71 हजारांच्या खाली गेला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 2,300 डॉलरच्या आसपास आहे. देशांतर्गत फ्युचर्स मार्केटमध्ये, MCX वर सोन्याच्या किमतीने 22 मेरोजी विक्रम केला होता. यावेळी सोनं 74,442 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं होतं.

मात्र, आज सोन्याचे दर घसरले आहेत. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA)नुसार, सोन्याचा भाव आज 737 रुपयांनी घसरून 71,176 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सुरुवातीच्या (Gold-Silver Rate Today) व्यापारात त्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 70,905 रुपये होती.

सध्या काय आहेत भाव?

चीनच्या मध्यवर्ती बँकेने सोन्याच्या खरेदीवर लावलेल्या ब्रेकमुळे याचा परिणाम हा सराफा बाजारावर दिसून आला आहे. या वर्षी मे महिन्यात चीनच्या सोन्याच्या साठ्यात कोणताही बदल झालेला नाही. याआधी चीनच्या सोन्याच्या साठ्यात सलग 18 महिने वाढ झाली होती.

दरम्यान, किमती थोड्याफार कमी (Gold-Silver Rate Today) झाल्याने आता ग्राहक आनंदी झाले आहेत. यामुळे सराफा बाजारात पुन्हा ग्राहकांची वर्दळ दिसून येईल. सोन्याचे दर उतरल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.

News Title : Gold-Silver Rate Today 11 june 2024

महत्त्वाच्या बातम्या-

“..तर विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू”; नीट परीक्षेतील गोंधळावरून मनसेचा गंभीर इशारा

“लोक माझी लायकी विचारत होते, बीडच्या जनतेने माझी लायकी दाखवून दिली”

अखेर निलेश लंकेंनी इंग्रजी बोलून दाखवलीच; सुजय विखेंना सणसणीत टोला, पाहा Video

“स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखी…”, प्रितम मुंडेंची रक्षा खडसेंसाठी भावनिक पोस्ट चर्चेत

“कंगना आणि मी पती-पत्नी सारखं..”; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा