सत्तेची गणितं फिरली तशी सोन्यानेही रंग बदलले; गेल्या 5 वर्षांत ‘असे’ वाढले भाव

Gold Prediction

Gold-Silver Rate Today | 2024 या वर्षात देशात मोठ्या निवडणुका झाल्या. वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच जून महिन्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार आले. त्यानंतर महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. राज्याचा विचार केल्यास गेल्या काही वर्षात राजकीय समीकरणे बदलताना दिसली. या तीन ते 4 वर्षात सत्ताबदल झाले. राजकीय गणिते जशी या काळात फिरली तशी मौल्यवान धातू सोन्याने देखील आपले रंग दाखवले. गेल्या 5 वर्षांचा विचार केल्यास सध्या सोने आणि चांदीच्या दरात तब्बल 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Gold-Silver Rate Today)

आज 12 डिसेंबर 2024 रोजी, 22 कॅरेट सोने 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, एक किलो चांदीचा भाव हा तब्बल 95,500 रुपये इतका आहे. हीच किंमत 12 डिसेंबर 2020 मध्ये 48,594 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी होती. म्हणजेच या 5 वर्षात 24 कॅरेट सोन्याची किंमत ही जवळपास 30 हजारांनी वाढली.

मागच्या वर्षीच्या तुलनेत सोन्यात झाली ‘इतकी’ वाढ

तर, 12 डिसेंबर 2020 मध्ये एक किलो चांदीचे दर हे 62 हजार 250 रुपये किलो होते. या 5 वर्षात चांदीत जवळपास 37 ते 38 हजारांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीचे दर पाहिले तर आजच्याच दिवशी म्हणजेच 12 डिसेंबर 2023 मध्ये 22 कॅरेट सोने 57,050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,280 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तसेच, चांदी 75,800 रुपये किलो होती. (Gold-Silver Rate Today)

म्हणजेच या एक वर्षात सोन्यात तब्बल 20 हजारांची वाढ झाली. या 2024 मध्ये सोन्याच्या दरवाढीने अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. मागच्या वर्षी 75 हजार रुपये किलोने मिळणारी चांदी यावर्षी तब्बल 95 हजारांवर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी चांदी लाखाच्याही पुढे गेली होती.म्हणजेच या वर्षी सोने आणि चांदीने ग्राहकांना चांगलाच फटका दिला.

आजचे 14 ते 24 कॅरेटचे भाव-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,452 रुपये, 23 कॅरेट 62,206 रुपये, 22 कॅरेट सोने 56,290 रुपये झाले. तर 18 कॅरेट सोने 46,089 रुपये, 14 कॅरेट सोने 35,949 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )

News Title – Gold-Silver Rate Today 12 December 2024

महत्त्वाच्या बातम्या-

कुणाला संधी तर कुणाचा पत्ता कट?, फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख ठरली

महालक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 5 राशींचे येणार सोन्याचे दिवस, सर्व मनोकामना पूर्ण होणार!

सतीश वाघ यांच्या हत्येचं गूढ उकललं, इतक्या लाखांची दिली सुपारी

धक्कादायक! पत्नीच्या छळाला कंटाळून २४ पानांचे पत्र लिहीत AI इंजिनिअरने संपवलं जिवन

पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र; काय आहे कारण?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .