ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा 80 हजारांवर?, जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Rate Today 12 January 2025

Gold-Silver Rate Today | या नवीन वर्षाच्या अगदी पहिल्या दिवसापासून मौल्यवान धातू सोन्याने जबरदस्त फटकेबाजी केली आहे. या 10 दिवसांचा विचार केला तर सोने आणि चांदीत प्रत्येकी 2 हजारांची दरवाढ दिसून आली. या आठवड्यात देखील सोने वरचढ दिसून आले. सोमवारी भाव स्थिर होता. तर, बुधवारी त्यात 100 रुपयांची तर गुरुवारी 380 रुपयांची भर पडली. (Gold-Silver Rate Today)

10 जानेवारीला सोने 270 रुपयांनी महागले. या तीन दिवसांत सोने 650 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. या आठवड्यात चांदीने देखील कमाल दाखवली.

या सोमवारी चांदीने एक हजारांची भरारी घेतली. मध्यंतरी ब्रेक घेतल्यानंतर 10 जानेवारी रोजी चांदी 1 हजारांनी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव सध्या 93,500 रुपये किलो इतका आहे. या आठवड्यात सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी ग्राहकांचा खिसा चांगलाच खाली केला.

14 ते 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,018, 23 कॅरेट 77,706, 22 कॅरेट सोने 71,465 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 58,514 रुपये, 14 कॅरेट सोने 45,641 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 12 January 2025

महत्त्वाच्या बातम्या-

हार्ट अटॅक नव्हे तर…टिकू तलसानिया यांना झालंय तरी काय?; प्रकृती अत्यंत नाजुक

दिवसाची सुरुवात आनंदवार्ताने, पेट्रोल-डिझेलचे दर ‘इतक्या’ रुपयांनी घसरले?

आजचे राशीभविष्य! कुंभ, मकर व तुळसह ब्रह्म योगात ‘या’ राशींचं भाग्य उजळणार

“धनंजय मुंडे तुमची टोळी थांबवा”, अन्यथा….; जरांगे पाटलांचा इशारा

संतोष देशमुखांची हत्या ‘इतक्या’ कोटींसाठी केली, सुरेश धसांचा हल्लाबोल

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .