Gold-Silver Rate Today | एप्रिल आणि मे या दोन महिन्यात सोन्याच्या किमतीने अनेक विक्रम नोंदवले. सोने वाढीचं हे सत्र अजूनही सुरूच असल्याचं चित्र आहे. जून महिन्यात देखील सोन्याचे भाव रॉकेटच्या तेजीत होते. महिन्याच्या अखेरीस काही प्रमाणात किमती कमी झाल्या होत्या. तर, जुलै महिन्यातही सोन्याने काही (Gold-Silver Rate Today) अंशी दिलासा दिला.
सध्या सराफ बाजारात किमतीमध्ये चढ-उताराचे सत्र दिसून येत आहे. या आठवड्यात सोने आणि चांदीत तीन दिवसांच्या घसरणीनंतर उसळी आली आहे. या आठवड्याची सुरुवात चांगली झाली. पण नंतर दोन्ही धातूत घसरण दिसली. आता आठवड्याच्या अखेरच्या सत्रात पुन्हा किमती वाढल्या आहेत.
आजच्या सोने-चांदीच्या किमती
जुलै महिन्याच्या पहिल्या (Gold-Silver Rate Today)आठवड्यात सोने 1500 रुपयांनी वधारले होते. 8 जुलै रोजी 220 तर 9 जुलै रोजी सोने 380 रुपयांनी घसरले. त्यानंतर किंमतीत कोणताही बदल नोंदवला गेला नाही. तर काल, 11 जुलै रोजी सोने 220 रुपयांनी वधारले.
आज 12 जुलैरोजी सकाळी पण दरवाढीचे संकेत दिसत आहेत. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 67,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,357 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या महिन्यात चांदीचे भावही वाढले (Gold-Silver Rate Today)आहेत. महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात 5,000 रुपयांची भरारी घेतल्यानंतर सध्या चांदीमध्ये चढ-उतार दिसून येत आहे. 8 जुलै रोजी चांदी 200 रुपयांनी वधारली आणि 9 जुलै रोजी 500 रुपयांनी भाव उतरले. काल त्यात हजार रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,500 रुपये आहे.
घरबसल्या जाणून घ्या भाव
दरम्यान, तुम्ही सोने आणि (Gold-Silver Rate Today) चांदीच्या किंमती घरबसल्या पण जाणून घेऊ शकता. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
News Title : Gold-Silver Rate Today 12 july 2024
महत्त्वाच्या बातम्या-
आज ‘या’ राशीच्या लोकांचं नशीब फळफळणार, पैसा अन् सन्मान भरभरून मिळणार
शहाजीबापू रुग्णालयात तर गणपत गायकवाड जेलमध्ये; महायुतीचं मतांचं गणित बिघडणार?
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान; कुणाची विकेट पडणार?
कतरिना कैफ होणार आई?, सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
शत्रुघ्न सिन्हा यांना लाडक्या जावयाकडून मिळालं मोठं सरप्राईज!