Gold-Silver Rate Today | सोने आणि चांदीने आज 12 मे रोजी आठवड्याच्या शेवटी ग्राहकांना दिलासा दिला आहे. बेशकिंमती धातूंच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. अक्षय्य तृतीयेला झालेल्या दरवाढीने ग्राहकांचा हिरमोड झाला होता. मात्र, आज किंमती घसरल्याने बराच दिलासा मिळाला आहे.
या आठवड्यात 6 आणि 7 मे रोजी सोन्याच्या दरात 330 रुपयांची वाढ झाली. 8 आणि 9 मे रोजी प्रत्येकी 100 रुपयांनी किंमत कमी झाली. 10 मे रोजी सोन्यात 1530 रुपयांची दरवाढ झाली. तर 11 मे रोजी किंमतीत 330 रुपयांची घसरण झाली.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 67,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोनं स्वस्त झालं असलं तरी भाव 70 हजारांच्या पुढेच आहेत.
चांदीचे दर काय?
या आठवड्यात चांदी 4700 रुपयांनी महागली.9 मे रोजी चांदीचे 200 रुपयांनी भाव वधारले. 10 मे रोजी पुन्हा 2500 रुपयांची वाढ झाली. 11 मे रोजी त्यात 700 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,000 रुपये आहे.
कॅरेटचा भाव काय?
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 73,008 रुपये, 23 कॅरेट 72,716 रुपये, 22 कॅरेट सोने 66,875 रुपये झाले. 18 कॅरेट 54,756 रुपये, 14 कॅरेट सोने 42,710 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने (Gold-Silver Rate Today) आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केले जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
News Title- Gold-Silver Rate Today 12 May 2024
महत्वाच्या बातम्या-
कार घेयचा विचार करताय? तर या आहेत टॉप-5 हॅचबॅक कार
शेतकऱ्यांची चिंता वाढली; अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार
मदर्स डे स्पेशल पाहा हे थ्रिलर चित्रपट; अंगावर येईल काटा
सुवर्णसंधी! बिग डिस्कॉउंटसह खरेदी करा ‘हा’ तगडा स्मार्टफोन
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ‘या’ उमेदवारांमध्ये होणार कांटे की टक्कर; जनतेचा कौल कोणाला?