गुड न्यूज! सोने-चांदीत मोठी घसरण, जाणून घ्या आजच्या किंमती

Gold-Silver Rate Today 12 November 2024

Gold-Silver Rate Today | सराफा बाजारात सोने-चांदीमध्ये मोठी स्वस्ताई झाल्याचं चित्र दिसून येत आहे.त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूमध्ये चढ-उताराचे सत्र दिसून येत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला मात्र, सोने आणि चांदी यांच्यात घसरण दिसून आली. (Gold-Silver Rate Today )

गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याने 900 रुपयांची मुसंडी मारली होती. सोने 1 हजारांहून अधिकने वधारले होते. तर या सोमवारी सोने 600 रुपयांनी घसरले. तर, आज 12 नोव्हेंबररोजी सकाळच्या सत्रातही घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गेल्या आठवड्यात चांदीमध्ये 4 हजारांची घसरण झाली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी एक हजार रुपयांनी घसरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,000 रुपये इतका आहे. मागच्या महिन्यात चांदीने लाखांचा टप्पा गाठला होता. या महिन्यात मात्र, चांदीमध्ये नरमाई दिसून आली आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,840 23 कॅरेट 76,532, 22 कॅरेट सोने 70,385 रुपयांवर घसरले. तर 18 कॅरेट आता 57,630 रुपये, 14 कॅरेट सोने 44,951 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान, वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today)

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 12 November 2024

महत्त्वाच्या बातम्या-

“आम्ही गांXची अवलाद नाही, कार्यकर्त्याला हात लावला तर..”; ‘या’ नेत्याचा गुलाबराव पाटलांना इशारा

आज कार्तिकी एकादशी, विष्णु देव ‘या’ राशींच्या मनोकामना पूर्ण करणार!

मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुलगा वयाच्या 12 व्या वर्षापासून ड्रग्सच्या विळख्यात!

महायुती सरकारने गोरगरिबांचं उत्पन्न वाढवण्याचं काम केलं- संभाजी पाटील निलंगेकर

अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तर…? शरद पवारांच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .