Gold-Silver Rate Today | ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात आज (12 जून ) मोठी घसरण झाली आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात सोन्याच्या दरात विक्रमी नोंद झाली होती.मात्र, जून महिन्यात भाव सतत कमी होताना दिसून येत आहेत.
MCX वर सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. कालच्या तुलनेमध्ये सोन्याचे भाव आज कमी झाले आहेत. आज सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
चांदीच्या भावात देखील मोठी घसरण झाली आहे. आज 13 जूनरोजी चांदीमध्ये तब्बल 2000 रुपयांची घरसण झाली आहे.त्याचबरोबर कालच्या तुलनेत सोने 600 रुपयांनी कमी झाले आहे.
जाणून घ्या आजच्या सोन्या-चांदीच्या किंमती
आज सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा (Gold-Silver Rate Today) दर हा 71,388 रुपयांवर आला आहे. तर बुधावारी हाच दर 71,970 रुपये होता.यासोबतच चांदीच्या दरात 2,000 रुपयांची घसरण झाल्यानंतर, सध्या चांदीचे दर हे 88,500 रुपये प्रति किलो आहेत.
मुंबईत हीच किंमत 24 कॅरेट सोने 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90,700 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मेट्रो सिटीमध्येही मौल्यवान धातूचे भाव जरा वाढलेलेच दिसत आहेत. दिल्लीत 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 95,200 रुपये प्रति किलो आहे.
घरबसल्या जाणून घ्या भाव
दरम्यान, तुम्ही सोने आणि (Gold-Silver Rate Today) चांदीच्या किंमती घरबसल्या पण जाणून घेऊ शकता. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
News Title : Gold-Silver Rate Today 13 june 2024
महत्त्वाच्या बातम्या-
“जनतेच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल राग, लोक आता मनसेची वाट बघतायेत”
नवरा मैत्रिणीसोबत करत होता रोमान्स, तेवढ्यात बायकोने पाहिलं अन्…;संभाजीनगर हादरलं
गोळीबार प्रकरणात सलमान खानचा धक्कादायक जबाब; म्हणाला..
“जीव देऊन भागणार नाही बाळांनो, तुम्हाला माझी शपथ”; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती
भाजप अजित पवारांना वाऱ्यावर सोडणार?, विधानसभेआधी मोठा निर्णय घेणार