ग्राहकांना सुखद धक्का! सोनं झालं स्वस्त, ‘इतक्या’ रुपयांनी उतरले भाव

Gold-Silver Rate Today 15 December 2024

Gold-Silver Rate Today | मौल्यवान धातू सोन्याने आज 15 डिसेंबररोजी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातु तेजीत दिसून आले. मात्र, आठवड्याच्या शेवटी किमती खाली उतरताना दिसून आल्या. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम हा सराफा बाजारावर देखील दिसून आला. सध्या लग्न सराईचा हंगाम सरू झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळालाय. (Gold-Silver Rate Today)

या आठवड्यात सोन्याच्या भावात 2 हजारांची वाढ दिसून आली. 9 डिसेंबर रोजी सोने 160, 10 डिसेंबरला 820 रुपये तर 11 डिसेंबर रोजी 870 रुपयांनी सोने महागले. तर 13 डिसेंबर रोजी सोने 600 रुपयांनी स्वस्त झाले. आज सकाळच्या सत्रात देखील सोन्याने आनंदवार्ता दिली आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,002 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

या आठवड्यात चांदीने देखील ग्राहकांना खुश केलं आहे. चांदीमध्ये 4 हजारांची मोठी घसरण दिसून आली. तर बुधवारी एक हजारांनी किंमती उतरल्या. 13 डिसेंबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,500 रुपये इतका आहे.

आजचे 14 ते 24 कॅरेटचे भाव-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,922, 23 कॅरेट 76,614, 22 कॅरेट सोने 70,461 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 57,692 रुपये, 14 कॅरेट सोने 44,999 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 15 December 2024

महत्त्वाच्या बातम्या-

मंत्रीपदासाठी भाजपकडून पहिला फोन नितेश राणेंना, अजून कुणाकुणाला फोन?

आज या’ राशींचं भाग्य खुलणार, राजकारणात लागणार मोठ्या पदाची लॉटरी

भावी मंत्र्यांना मध्यरात्री कॉल, शिवसेनेकडून ‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?

आज महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार, ‘हे’ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ?

आज मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धन व सुखाचा वर्षाव!

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .