Gold-Silver Rate Today | या आठवड्यात सोन्याच्या भावात सलग घसरण दिसून आली आहे. 11 नोव्हेंबर रोजी सोने 600 रुपयांनी खाली आले. मंगळवारी 147 रुपयांनी तर 13 नोव्हेंबर रोजी 440 रुपयांची घसरण झाली.काल 14 नोव्हेंबररोजी भाव 120 रुपयांनी खाली आले होते. आज सकाळच्या सत्रातही किंमती खाली आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Gold-Silver Rate Today)
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 69,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. या आठवड्यात चांदी जवळपास 5 हजारांनी उतरली आहे. सोमवारी चांदी 1 हजार रुपयांनी उतरली. मंगळवारी चांदीत 2 हजारांची घसरण झाली. तर आज सकाळच्या सत्रातही चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 89,500 रुपये इतका आहे.
कॅरेटचा भाव जाणून घ्या-
10 ग्रॅम सोन्यासाठी 22 कॅरेटची किंमत 67,545 रुपये आहे
10 ग्रॅम सोन्यासाठी 24 कॅरेटची किंमत 73,739 रुपये आहे
10 ग्रॅम सोन्यासाठी 18 कॅरेटची किंमत 55,304 रुपये आहे
10 ग्रॅम सोन्यासाठी 14 कॅरेटची किंमत 43,137 रुपये आहे
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )
सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)
News Title – Gold-Silver Rate Today 15 November 2024
महत्त्वाच्या बातम्या-
दिशा सालियन प्रकरणी पुन्हा चौकशी लावणार, ‘या’ नेत्याचा आदित्य ठाकरेंना इशारा
आज कार्तिक पौर्णिमेला ‘या’ राशींवर राहणार विष्णुदेव व लक्ष्मीची कृपा!
संभाजी पाटील निलंगेकरांचा वंचित बहुजन आघाडीला झटका!
ऐश्वर्याला धोका दिल्याच्या चर्चांदरम्यान अभिषेकचं मोठं वक्तव्य, म्हणाला…
आनंदवार्ता! लग्नसराईत सोनं झालं स्वस्त; 1 ग्रॅमसाठी मोजा फक्त ‘इतके’ रुपये