मोठ्या उसळीनंतर सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

Gold-Silver Rate Today | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदीने ग्राहकांना काही अंशी दिलासा दिला आहे. या आठवड्यात सलग दोन दिवस किमती रॉकेटच्या तेजीत होत्या. सोन्यात 1100 तर चांदीमध्ये 2600 रुपयांची वाढ झाली.आज (18 मे) मौल्यवान धातूच्या किंमतीमध्ये थोडी फार घसरण झाली आहे.

13 आणि 14 मे रोजी किंमती अनुक्रमे 100 आणि 400 रुपयांनी उतरल्या. त्यानंतर 15 मे आणि 16 मे रोजी त्यात 400 आणि 770 रुपयांची वाढ झाली. 17 मे रोजी किंमतीत 270 रुपयांची घसरण आली.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 67,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोनं अजूनही 70 हजारी पारच आहे.

चांदीत किंचित घसरण

या आठवड्यामध्ये 13 मे रोजी चांदी 500 रुपयांनी उतरली (Gold-Silver Rate Today) तर 14 मे रोजी 700 रुपयांनी त्यात पुन्हा वाढ झाली. 15 आणि 16 मे रोजी अनुक्रमे 400 आणि 1500 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 89,100 रुपये आहे.

कॅरेटचा भाव काय?

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी घसरली. 24 कॅरेट सोने 73,383 रुपये, 23 कॅरेट 73,089 रुपये, 22 कॅरेट सोने 67,219 रुपये झाले. 18 कॅरेट 55,037 रुपये, 14 कॅरेट सोने 42,929 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय (Gold-Silver Rate Today) बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title : Gold-Silver Rate Today 18 May 2024

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपच्या ‘या’ उमेदवारानी पैसे वाटले? ठाकरे गटाचा आरोप; फडणवीस थेट…

उद्धव ठाकरेंचा संबंध “भगव्याशी नाही तर फक्त हिरव्याशी”…’या’ बड्या नेत्याचा हल्लाबोल

गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा संभवतो; या राशीच्या व्यक्तींनी करावी गुंतवणूक

“उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांचं लांगुलचालन केलं, त्यांना पायघड्या घातल्या”

होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू!