Gold-Silver Rate Today | उद्या 20 नोव्हेंबररोजी राज्यात मतदान पार पडते आहे. निवडणुकीनंतर राज्यात नवीन सरकार स्थापन होईल. निवडणुकीला काही तास बाकी असताना सराफा बाजारात एकदमच तेजी आली आहे. गेल्या काही दिवसात सोन्यात चढ-उतारचे सत्र दिसून आले. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीलाच मौल्यवान धातूने ग्राहकांना धक्का दिलाय. (Gold-Silver Rate Today)
गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत 1300 रुपयांनी उतरली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोने 660 रुपयांनी महागले. सोमवारी सोन्याने उसळी घेतली. आज सकाळच्या सत्रातही मौल्यवान धातुत दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 70,010 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
सध्या चांदीमध्ये घसरण दिसून येत आहे. गेल्या दोन आठवड्यात चांदीला मोठी आघाडी घेता आली नाही. चांदी गेल्या आठवड्यात 5 हजार रुपयांनी उतरली. आज सकाळच्या सत्रातही घसरण दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 89,500 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या-
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 74,808, 23 कॅरेट सोने 74,508, 22 कॅरेट सोने 68,524 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 56,106 रुपये, 14 कॅरेट सोने 43,763 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )
सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)
News Title – Gold-Silver Rate Today 19 November 2024
महत्त्वाच्या बातम्या-
मतदान कार्ड हरवलंय? तर या ओळखपत्रांआधारे करता येणार मतदान
निवडणुकीत उतरलेल्या 19 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे, सर्वाधिक गुन्हेगार भाजपात?
प्रचारसभा थंड होताच ‘खिशे’ झाले गरम, कोकणात मध्यरात्री पडला पैशांचा पाऊस?
अनिल देशमुखांवरील हल्ला म्हणजे स्टंटबाजी, भाजपने ‘ते’ आरोप फेटाळले
अनिल देशमुखांवर हल्ला करणाऱ्यांकडून ‘भाजप जिंदाबाद’च्या घोषणा?, नेमकं काय घडलं?