नवीन वर्षात सोनं स्वस्त झालं की महाग?, काय आहेत सध्या ग्रॅमचे दर?

Gold-Silver Rate Today 2 January 2025

Gold-Silver Rate Today | 2024 या वर्षात मौल्यवान धातू सोन्याने ग्राहकांचा खिसा चांगलाच खाली केला. आता या नवीन वर्षात ग्राहक सोनं थोडा तरी दिलासा देईल, या प्रतिक्षेत आहेत. डिसेंबरच्या अखेरच्या दोन दिवसात चांदी 1900 रुपयांनी स्वस्त झाली होती. तेव्हापासून चांदीचे दर जैसे थेच आहेत. तर, सोन्याने पुन्हा एकदा आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही दिवसात सोने 90 हजारी भरारी घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Gold-Silver Rate Today)

डिसेंबरच्या अखेरच्या टप्प्यात सोने 650 रुपयांनी महागले. या आठवड्याच्या सुरुवातीला 30 डिसेंबर रोजी सोने 160 रुपयांनी वधारले. तर, 31 डिसेंबररोजी त्यात 440 रुपयांची घसरण झाली. काल 1 जानेवारीरोजी वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने 440 रुपयांनी महागले. आज 2 जानेवारीरोजी सकाळच्या सत्रात देखील दरवाढीचे संकेत मिळत आहेत.

गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, चांदीमध्ये 30 डिसेंबरपासून कोणताच बदल दिसून आला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटच दर काय आहेत?

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,583, 23 कॅरेट 76,276, 22 कॅरेट सोने 70,150 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 57,437 रुपये, 14 कॅरेट सोने 44,802 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 2 January 2025

महत्त्वाच्या बातम्या-

सरकारला कोटींचा चुना लावत GFवर उधळले पैसे; अखेर ‘तो’ आरोपी अटकेत

सरपंच हत्या प्रकरणी फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय!

श्री स्वामींच्या कृपेने आज ‘या’ राशींची सगळी कामे सुरळीत पार पडतील!

धक्कादायक! ‘तो’ प्रयोग होऊ नये म्हणून कराडने केलं आजारपणाचं सोंग?

“सीआयडीला जमत नसेल तर शिवाजी साटम यांच्याकडे तपास द्या”

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .