दिवाळी पाडव्याला मिळाली आनंदवार्ता, सोनं झालं स्वस्त; पाहा आजचे दर

Gold price prediction

Gold-Silver Rate Today | या आठवड्यात मौल्यवान धातू सोन्यामध्ये काही अंशी घसरण दिसून आली. लक्ष्मी पूजनापूर्वी दोन्ही धातुनी मोठी उसळी घेतली होती. त्यानंतर भाव मात्र खाली घसरताना दिसून आले. आता दिवाळी पाडव्यासाठी सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी आनंदवार्ता मिळाली आहे. सोनं स्वस्त झालं आहे. सोन्याचे दर पुन्हा खाली आले आहेत. (Gold-Silver Rate Today)

या आठवड्यात म्हणजेच 29 आणि 30 ऑक्टोबरला मौल्यवान धातुत 600 आणि 700 रुपयांची दरवाढ झाली. त्यानंतर 31 ऑक्टोबरला सोनं 170 रूपयांनी वाढले. 1 नोव्हेंबर रोजी सोने 770 रुपयांनी घसरले. तर आज सकाळच्या सत्रात त्यात पुन्हा घसरणीचे सत्र दिसले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोनं 74,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,071 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, चांदीमध्ये 31 ऑक्टोबर नंतर कोणतीच अपडेट दिसून आली नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये झाला आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोनं 79,557, 23 कॅरेट 79,238 22 कॅरेट सोनं 72,874 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 18 कॅरेट आता 59,668 रुपये, 14 कॅरेट सोनं 46,541 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

दरम्यान, वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today)

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 2 November 2024

महत्त्वाच्या बातम्या-

बारामतीत दोन ठिकाणी पाडवा साजरा होणार?; पार्थ पवारांकडून मोठा खुलासा

महायुतीला धक्का, शिंदेंच्या उमेदवाराला भाजपकडूनच आव्हान

संभाजीराव पाटील निलंगेकरांची ताकद वाढली, संपूर्ण निलंगा भाजपमय

मोठी बातमी! दोन्ही ठाकरे एकत्र येणार, मनसे देणार ठाकरे गटाला पाठिंबा?

“प्रकाश आंबेडकरांनी छातीवर ताण येईल अशी वक्तव्ये ICU मधून करु नयेत”

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .