Gold-Silver Rate Today | या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदी या दोन्ही धातूमध्ये नरमाई दिसून आली. सोन्याने 17 जुलै रोजी थेट हजाराची झेप घेतली. पण गुरुवारपासून दोन्ही धातूत मोठी पडझड दिसून येत आहे. या काळात (Gold-Silver Rate Today) चांदीने देखील मोठा दिलासा दिला आहे.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 15 जुलैरोजी सोने 110 रुपयांनी स्वस्त झाले. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 18 जुलै रोजी 160, 19 जुलैला 490 आणि आज 20 जुलैरोजी सकाळी 100 रुपयांनी भाव उतरले.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA),आता 22 कॅरेट सोने 68,290 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचे भाव 3 हजारांनी उतरले
या आठवड्यात चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. 17 जुलै रोजी चांदी एक हजार रुपयांनी महागली. त्यानंतर आतापर्यंत सलग घसरणीचे सत्र दिसून आले. 18 जुलै रोजी 1,300 रुपये तर 19 जुलै रोजी 1,450 रुपये आणि आज सकाळी किलोमागे 100 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो (Gold-Silver Rate Today) चांदीचा भाव 93,150 रुपये आहे.
कॅरेटचा भाव काय?
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 73,240 रुपये, 23 कॅरेट 72,947 रुपये, 22 कॅरेट सोने 67,088 रुपये झाले. 18 कॅरेट 54,930 रुपये, 14 कॅरेट सोने 42,845 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय (Gold-Silver Rate Today) बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क नसते. तसेच सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
News Title : Gold-Silver Rate Today 20 july 2024
महत्त्वाच्या बातम्या-
शनीदेवाच्या कुपेने ‘या’ 3 राशींना मोठा धनलाभ होणार!
विदर्भात पावसाचं थैमान! ‘या’ भागांतील शाळांना सुट्टी जाहीर
पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!
‘आता लाडक्या नातवाचं बघा’; मनसे नेत्याने मुख्यमंत्र्यांना सुनावलं
‘असं कोणी मिळालं ज्याच्यासोबत मी…’; हार्दिक पांड्याचा खुलासा