ग्राहकांसाठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, किती रुपयांनी घसरले भाव?

Gold-Silver Rate Today 21 December 2024

Gold-Silver Rate Today | या आठवड्यात मौल्यवान धातू सोने बऱ्याच अंशी खाली उतरले. सलग तीन दिवसांपासून सोन्यात घसरण होत आहे. या आठवड्यात सोने आणि चांदी या दोन्ही धातूंना आघाडी घेता आली नाही. आज 21 डिसेंबर शनिवारी, सोन्यात पुन्हा घसरण दिसून आली. त्यामुळे सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे. (Gold-Silver Rate Today)

या आठवड्यात सलग तीन दिवसांच्या घसरणीने सोने 1200 रुपयांनी उतरले. मंगळवारी सोने 110 रुपयांनी वधारले तर बुधवारी त्यात 160 रुपयांची घसरण दिसली. काल, 20 डिसेंबर रोजी किंमती 330 रुपयांनी उतरल्या. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 70,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

तर, चांदीने देखील ग्राहकांना आनंदवार्ता दिली. या आठवड्यात चांदी दोन हजारांनी स्वस्त झाली. मागील आठवड्यात चांदी 5,500 रुपयांनी महागली होती. तर, या दोन दिवसांत चांदी 2 हजारांनी उतरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,377, 23 कॅरेट 75,075, 22 कॅरेट सोने 69,045 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 56,533 रुपये, 14 कॅरेट सोने 44,096 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 21 December 2024

महत्त्वाच्या बातम्या-

तुम्ही रॉयल्टी चोरी करता, तोंड काळ का केलं? भाजपच्या ‘या’ नेत्याचा खडसेंना सवाल

मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्लाला पोलिसांकडूनच VIP ट्रीटमेंट?, मोठा खुलासा समोर

बीडचं राजकारण तापणार?, शरद पवार आज मस्साजोग दौऱ्यावर

“माझ्या बाबांना ज्या प्रकारे मारलं, तशीच शिक्षा…”; संतोष देशमुखांच्या मुलीचा टाहो

इंधनदरात दिलासा! पेट्रोल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या लेटेस्ट दर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .