Gold-Silver Rate Today | आज 21 जूनरोजी मौल्यवान धातूच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. आज वटसावित्रीनिमित्त तुम्ही जर आपल्या प्रिय पत्नीला दागिने भेट देणार असाल, तर तुमच्या खिशाला आज मोठी झळ बसू शकते. सोने आणि चांदी दोन्हीच्या किमती आज वधारल्या आहेत.
या आठवड्यात सोन्यात चढउताराचे सत्र दिसून आले. 17 जूनरोजी सोने 220 रुपयांनी घसरले. 18 जूनला 100 रुपयांनी किंमती स्वस्त झाल्या. 19 तारखेला किंमती जैसे थे होत्या. तर 20 जूनला 220 रुपयांची दरवाढ झाली.
सोने-चांदीचे भाव वधारले
आज 21 जूनला पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 66,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
तर, या आठवड्यात चांदीचेही भाव वाढल्याचं चित्र आहे. 15 तारखेला चांदीत 500 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 18 जूनला त्यात पुन्हा (Gold-Silver Rate Today ) 500 रुपयांची वाढ झाली. काल, 20 जूनरोजी तर 1500 रुपयांनी भाव वाढले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,500 रुपये आहे.
कॅरेटचा भाव कसा असेल?
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 72,164 रुपये, 23 कॅरेट 71,873 रुपये, 22 कॅरेट सोने 66,100 रुपये झाले. 18 कॅरेट 54,122 रुपये, 14 कॅरेट सोने 42,215 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे.
घरबसल्या जाणून घ्या भाव
दरम्यान, तुम्ही सोने आणि (Gold-Silver Rate Today) चांदीच्या किंमती घरबसल्या पण जाणून घेऊ शकता. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
News Title : Gold-Silver Rate Today 21 june 2024
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यातील ‘या’ भागांना हवामान विभागाचा मोठा इशारा; ऑरेंज अलर्ट जारी
वट सावित्री पौर्णिमा का साजरी करतात? जाणून घ्या यामागचे कारण
सहा वर्षीय बालिकेला अत्याचार करुन संपवलं, संतप्त जमावानी केलं धक्कादायक कृत्य
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर
या दोन राशीच्या व्यक्तींना सौभाग्य लाभणार