Gold-Silver Rate Today | महाराष्ट्रात काल 20 नोव्हेंबररोजी मतदान पार पडले आहे. यानंतर सराफा बाजारात दरवाढीला कौल मिळाला आहे. मौल्यवान धातू सोन्याने चांगलीच आघाडी घेतली आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याला आघाडी घेता आली नाही. या आठवड्याच्या सुरुवातीलाच भावात तेजी दिसून आली. (Gold-Silver Rate Today )
या तीन दिवसात सोने जवळपास दोन हजार रुपयांनी महागले. सोमवारी 660, तर मंगळवारी 760 रुपयांची वाढ झाली होती. काल 20 नोव्हेंबररोजी त्यात पुन्हा 550 रुपयांची भर पडली. आज 21 नोव्हेंबररोजी सकाळच्या सत्रातही दरवाढीचे संकेत मिळाले आहेत.
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचे भावही सध्या तेजीत आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून चांदीमध्ये चढ-उतार दिसून येत आहे. काल, 20 नोव्हेंबर रोजी 500 रुपयांनी किंमती वधारल्या. आज सकाळच्या सत्रातही चांदीने दरवाढीचे संकेत दिले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये इतका आहे. (Gold-Silver Rate Today )
14 ते 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या-
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,873 रुपये, 23 कॅरेट 75,569, 22 कॅरेट सोने 69,500 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट सोने आता 56,905 रुपये, 14 कॅरेट सोने 44,386 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )
सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)
News Title – Gold-Silver Rate Today 21 November 2024
महत्त्वाच्या बातम्या-
विधानसभेतही अजितदादा बॅकफूटवर; लोकसभेची पुनरावृत्ती होणार का?
मविआचा मुख्यमंत्री कोण असेल? संजय राऊतांनी दिलं उत्तर
राज्यात कुणाचं सरकार येणार?, प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकीत समोर
‘या’ गोष्टींमुळे सरकार आमचंच येणार; भुजबळांना अतिविश्वास
राज ठाकरे ठरणार किंगमेकर?, मनसेबाबत काय सांगते एक्झिट पोल्सची आकडेवारी?