सोन्याचा ग्राहकांना मोठा दिलासा; ‘इतक्या’ रुपयांनी भाव घसरले

Gold-Silver Rate Today | गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात प्रचंड उसळी आल्याचं दिसत आहे. मात्र, आज 22 मे रोजी ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर,चांदीचे दर अजूनही गगनाला भिडलेले आहेत.

आज सोन्याच्या दरात 800 रुपयांची घसरण झाली आहे. तर, चांदी आता 93 हजारांच्या घरात पोहचली आहे.चांदीमध्ये आज पुन्हा 300 रुपयांची वाढ झाली. जलगावमध्ये चांदी 92 हजार 800रुपये प्रति किलोवर विकली जात आहे.

सोन्यात स्वस्ताई तर चांदी सुसाट

सध्या सोन्याचे दर हे 74 हजार 300 रुपये तोळ्यावर पोहोचले आहेत. 19 मे रोजी सोन्याच्या भावात एक हजाराने तर चांदीच्या दरात प्रति किलोमागे 3 हजार रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सोन्याने आता 75 हजारांचा आकडा पार केलाय.

सोन्याचा भाव जीएसटीसह 76 हजार 200 तर चांदीचे भाव प्रति किलो 91 हजारांवर पोहचला होता. आज थोड्या प्रमाणात किंमती उतरल्या आहेत. चांदी अजूनही सुसाटच आहे. काही दिवसांत चांदी आता लाखाच्या घरात जाते की काय, असा प्रश्न आहे.

घरबसल्या जाणून घ्या भाव

जागतिक बाजारात सोन्याची मागणी मोठी आहे. चीनमध्ये सोने आणि चांदी खरेदीसाठी ग्राहक मोठी मागणी करत आहेत.अनेक देशाच्या मध्यवर्ती, केंद्रीय बँक सोन्याचा साठा करुन ठेवत आहेत. यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, तुम्ही सोने आणि चांदीच्या किंमती घरबसल्या पण जाणून घेऊ शकता. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

News Title : Gold-Silver Rate Today 22 May 2024

महत्त्वाच्या बातम्या-

दहावीचा निकाल ‘या’ तारखेपर्यंत लागणार; शालेय शिक्षण मंत्र्याने दिली माहिती

एलिमिनेटर सामन्यात RCB चं पारडं जड राहणार; तर राजस्थानचा संघ पुन्हा ती चूक करणार?

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे अपघातातील आरोपीने आमदाराच्या मुलालाही दिला होता त्रास, आईच्या आरोपांनी खळबळ

पुण्यातील कार अपघातातील अग्रवाल कुटुंबीयांचं थेट अंडरवर्ल्ड कनेक्शन? नेमकं प्रकरण काय