सोन्याचा दरवाढीला कौल, दोनच दिवसांत झाली ‘इतक्या’ हजारांची वाढ; पाहा आजच्या किंमती

Gold-Silver Rate Today 22 November 2024

Gold-Silver Rate Today | या आठवड्याच्या सुरुवातीलाच मौल्यवान धातू सोन्याने आघाडी घेतली आहे. आज शुक्रवारी 22 नोव्हेंबररोजी भाव पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. या चार दिवसात सोन्याने 2300 रुपयांची भरारी घेतली आहे. आता लग्न सराईला सुरुवात झाली आहे, मात्र, सोनं तेजीत असल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. चांदीमध्ये देखील वाढ झाल्याचे चित्र आहे. (Gold-Silver Rate Today)

सोन्यात सोमवारी 660, तर मंगळवारी 760 रुपयांची वाढ झाली होती. 20 नोव्हेंबररोजी त्यात पुन्हा 550 रुपयांची भर पडली. काल, 21 नोव्हेंबररोजी सोने 300 रुपयांनी वधारले. आज सकाळच्या सत्रातही सोन्यात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

तर चांदीचे भावही सध्या तेजीत आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून चांदीमध्ये चढ-उतार दिसून येत आहे. 20 नोव्हेंबर रोजी 500 रुपयांनी किंमती वधारल्या. आज सकाळच्या सत्रातही चांदीने दरवाढीचे संकेत दिले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये इतका आहे. (Gold-Silver Rate Today )

14 ते 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,932, 23 कॅरेट 76,624, 22 कॅरेट सोने 70,470 रुपयांवर आहे. 18 कॅरेट सोने आता 57,699 रुपये, 14 कॅरेट सोने 45,005 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 22 November 2024

महत्त्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडीला बहुमत मिळणार?, आणखी एका एक्झिट पोलचा निकाल समोर

देवी लक्ष्मी ‘या’ राशीची झोळी सुख व पैशांनी भरवणार?, वाचा राशीभविष्य

महायुती सरकार घासून नाही तर ठासून येणार, ‘या’ नेत्याला विश्वास

अजितदादा ‘इतक्या’ मतांनी पडणार, बड्या नेत्याचा दावा

सोन्याला पुन्हा झळाळी, ‘इतकी’ झाली दरवाढ; काय आहेत सध्या किंमती?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .