Gold-Silver Rate Today | या आठवड्यात सोन्याने जोरदार आघाडी घेतली. 20 ऑगस्ट रोजी सोन्यात 120 रुपयांची घसरण झाली. 21 आणि 22 ऑगस्ट रोजी सोने अनुक्रमे 550 आणि 10 रुपयांनी वधारले.काल 22 ऑगस्टरोजी सोन्यात 380 रुपयांची घसरण झाली होती.(Gold-Silver Rate Today)
आज 23 तारखेला पुन्हा दिलासा मिळाला आहे. आठवड्याच्या शेवटी सोनं स्वस्त झालं आहे. सोन्यात आज सकाळी घसरणीचे संकेत दिसले. आज सकाळच्या सत्रात मौल्यवान धातूच्या किंमतीत घसरण झाली आहे. गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने 66,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
सोन्याच्या किमतीमध्ये जवळपास हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर, चांदीच्या किमती सध्या स्थिर आहेत. 20 ऑगस्ट रोजी चांदी 1 हजार रुपयांनी वधारली होती. 21 आणि 22 ऑगस्ट रोजी चांदीचा भाव स्थिर होता. आज सकाळच्या सत्रात चांदीमध्ये घसरणीचे संकेत मिळाले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव सध्या 86,900 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या-
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 71,599, 23 कॅरेट 71,312, 22 कॅरेट सोने 65,585 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,699 रुपये, 14 कॅरेट सोने 41,885 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.(Gold-Silver Rate Today)
घरसबल्या जाणून घ्या भाव-
दरम्यान, ग्राहक घरबसल्या देखील सोन्या-चांदीचे दर जाणून घेऊ शकतात. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवार आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.(Gold-Silver Rate Today)
News Title : Gold-Silver Rate Today 23 August 2024
महत्त्वाच्या बातम्या-
नीरज चोप्राने मोडला ऑलिम्पिकचा रेकॉर्ड; पाहा डायमंड लीगमधील बेस्ट थ्रो VIDEO
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन्ही जागा महायुतीकडे; ‘या’ दोन नेत्यांची बिनविरोध निवड!
आज ‘या’ राशींच्या व्यक्तींना आर्थिक तोटा होईल, ताणतणाव वाढेल!