Gold-Silver Rate Today | केंद्रीय अर्थसंकल्पानंतर मौल्यवान धातू सोन्याने चांगलीच आघाडी घेतली आहे. गेल्या आठवड्यात सलग चार दिवस सोन्याने मोठी उसळी घेतली. या आठवड्याची सुरुवात देखील महागाईने झाली.सध्या विवाह मुहूर्तात ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. (Gold-Silver Rate Today)
मागच्या आठवड्यात सोन्यात 2 हजारांची वाढ झाली.तर, या सोमवारी 100 रुपये, मंगळवारी 220 रुपये तर आज सकाळी सोन्यात 100 रुपयांच्या दरवाढीचे संकेत मिळत आहेत. चांदीत मात्र सध्या स्वस्ताई दिसून येत आहे.
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 88,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर सोमवारी चांदीत 500 रूपयांची वाढ झाली. मंगळवारी भाव स्थिर होता. तर आज सकाळी किंमतीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,01,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचे दर काय?
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,647, 23 कॅरेट 86,300, 22 कॅरेट सोने 79,369 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 64,985 रुपये, 14 कॅरेट सोने 50,689 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )
सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)