गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅमचे लेटेस्ट दर

Gold-Silver Rate Today 26 November 2024

Gold-Silver Rate Today | गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातू सोन्यामध्ये चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सोन्यात 3 हजारांची दरवाढ नोंदवली गेली. तर चांदी 2,500 रुपयांनी वधारली. या आठवड्यात मात्र, दोन्ही धातूमध्ये नरमाई दिसून आली आहे. सोमवारी दोन्ही धातुच्या किंमतीत घसरण झाली. आज 26 नोव्हेंबररोजी देखील सकाळच्या सत्रात किंमती खाली उतरताना दिसून आल्या. (Gold-Silver Rate Today)

गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली. काल (25 नोव्हेंबर) सोमवारी आणि आज मंगळवारी भाव उतरले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीने देखील आनंदवार्ता दिली आहे.

काल 25 नोव्हेंबररोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. गेल्या आठवड्यात सुरुवातीला चांदीने 2500 रुपयांची झेप घेतली. त्यानंतर भाव खाली उतरल्याचे दिसून आले. आज सकाळच्या सत्रात चांदीला आघाडी घेता आली नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,081, 23 कॅरेट 76,772, 22 कॅरेट सोने 70,606 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 57,811 रुपये, 14 कॅरेट सोने 45,092 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 26 November 2024

महत्त्वाच्या बातम्या-

राज्याला मिळणार ओबीसी मुख्यमंत्री?, नव्या मागणीची जोरदार चर्चा

पडळकर ते राणे, मंत्रीमंडळात ‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?; वाचा संपूर्ण यादी

एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार; कोण होणार पुढील CM?

आज उत्पत्ती एकादशीला ‘या’ राशींना होणार अचानक धनलाभ!

अभिषेक बच्चनकडून पहिल्यांदाच मोठा खुलासा, म्हणाला,”मला माहित होतं की ऐश्वर्या…”

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .