दहीहंडीला मिळाली आनंदवार्ता! सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Rate Today | आज 27 ऑगस्टरोजी दहीहंडीचा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातोय. आजच्या या शुभ दिनी सराफा बाजारातही उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. कारण, आज मौल्यवान धातूने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच काल 26 ऑगस्टरोजी भावात कोणतेच बदल झाले नाही. मात्र, आज सकाळी घसरणीचे संकेत मिळत आहेत. (Gold-Silver Rate Today )

सोने-चांदीचे दर

मागच्या आठवड्यात सोने चांगलेच वधारले होते. त्यानंतर सोनं 670 रुपयांनी घसरले. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी भावात कोणताच बदल झाला नाही. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार(IBJA), आता 22 कॅरेट सोने 67,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. तर, 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आज चांदीने देखील दिलासा दिला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच चांदीत 200 रुपयांची घसरण दिसून आली. आज सकाळच्या सत्रात चांदीत पुन्हा घसरणीचे संकेत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,800 रुपये आहे.(Gold-Silver Rate Today )

14 ते 24 कॅरेटचा भाव काय?

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार(IBJA) 24 कॅरेट सोने 72,042, 23 कॅरेट 71,754, 22 कॅरेट सोने 65,991 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 54,032 रुपये, 14 कॅरेट सोने 42,145 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. पाहायला गेलं तर सोनं अजूनही 70 हजारांच्या पुढेच आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.(Gold-Silver Rate Today )

News Title – Gold-Silver Rate Today 27 August 2024

महत्त्वाच्या बातम्या-

BCCI चं ऐतिहासिक पाऊल, क्रिकेटपटूंसाठी जय शाह यांची सर्वात मोठी घोषणा!

“आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा?”; मालवण घटनेने राज ठाकरेंचा संताप

आज दहीहंडीचा सण, श्रीकृष्णाची कृपा कुणावर असणार?; वाचा आजचे राशीभविष्य

वसंत मोरेंना ठाकरे गटाकडून मिळणार आमदारकीचं तिकीट? ‘या’ मतदारसंघात लढणार

कर्मचाऱ्यांनो महाराष्ट्रात नवीन पेन्शन योजनेचा लाभ कधी मिळणार? जाणून घ्या