Gold-Silver Rate Today | या आठवड्यात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मौल्यवान धातू सोन्यात चढ-उतार दिसून येत आहे. तर, चांदीला मोठी आघाडी घेता आलेली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही धातुत चढउताराचा फायदा ग्राहकांना झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे. सोन्याने आता दरवाढीला ब्रेक दिला आहे. तर, चांदीच्या किंमतीत घसरणीचे सत्र दिसून येत आहे. (Gold-Silver Rate Today)
गेल्या आठवड्यात सोने 1300 रुपयांनी स्वस्त झाले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात 220 रुपयांची घसरण झाली होती. सोमवारी 110 तर मंगळवारी त्यात 120 रुपयांची घसरण झाली. काल 27 नोव्हेंबररोजी 250 रुपयांची त्यात भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,120 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीने या आठवड्यात ग्राहकांनी खुश केलं आहे. गेल्या आठवड्यात चांदीत 2500 रुपयांची वाढ झाली होती. या आठवड्याच्या सुरूवातीला किंमतीत तितकीच घसरण झाली. आज (28 नोव्हेंबर) सकाळच्या सत्रातही चांदीमध्ये घसरण दिसून येत आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 89,500 रुपये इतका आहे. दिवाळीच्या काळात चांदी ही लाखाच्याही पुढे गेली होती. त्यामुळे या महिन्यात चांदीत जवळपास 10 हजारांची घसरण दिसून आली आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव-
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,175, 23 कॅरेट 75,870, 22 कॅरेट सोने 69,776 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 57,131 रुपये, 14 कॅरेट सोने 44,562 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )
सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)
News Title – Gold-Silver Rate Today 28 November 2024
महत्त्वाच्या बातम्या-
पराभव जिव्हारी लागला, शहाजीबापू पाटलांची मोठी घोषणा!
विनोद तावडेंचं ‘राजकीय वजन’ वाढणार, भाजपकडून मोठी जबाबदारी
आधी डिलीट केलं ट्विट, आता म्हणतात बाबा तुमचा अभिमान वाटतो!
मध्यरात्री दिल्लीत खलबतं, ‘या’ बड्या नेत्याने अमित शाहांची भेट घेतल्याने CM पदाचा सस्पेन्स वाढला
राज्यातील ‘या’ भागात थंडीची लाट उसळणार, हवामान विभागाचा महत्वाचा इशारा