Gold-Silver Rate Today | ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात मौल्यवान धातू सोन्याने मोठी आघाडी घेतली आहे. तर, चांदीने मात्र दिलासा दिला आहे. गेल्या आठवड्यापासून भावात चढ-उतार दिसून येत आहे. आज 29 ऑगस्टरोजी सोने किंचित वधारले आहे. आजच्या लेटेस्ट किमती खाली दिल्या आहेत. (Gold-Silver Rate Today )
आजच्या सोने-चांदीच्या किमती
या आठवड्यात सुरुवातीला सोन्याचा दर स्थिर होता. 27 ऑगस्ट रोजी सोन्यात थोडीफार घसरण झाली. तर 28 ऑगस्ट रोजी सोने 220 रुपयांनी महागले. आज सकाळच्या सत्रात त्यात किंचित वाढ दिसली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
तर, चांदीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कोणताच बदल नोंदवला गेला नाही. 27 ऑगस्ट रोजी चांदीत 600 रुपयांची वाढ झाली. 28 ऑगस्ट रोजी चांदीच्या किंमतीत बदल झाला नाही. आज 29 ऑगस्ट रोजी किंमत अवघ्या 100 रुपयांनी घसरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 88,400 रुपये आहे.(Gold-Silver Rate Today )
जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा भाव-
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,691, 23 कॅरेट सोने 71,404, 22 कॅरेट सोने 65,669 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,768 रुपये, 14 कॅरेट सोने 41,939 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
दरम्यान,वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.(Gold-Silver Rate Today )
News Title – Gold-Silver Rate Today 29 August 2024
महत्त्वाच्या बातम्या-
देशात झपाट्याने पसरतोय मंकीपॉक्स, ‘या’ 6 पद्धतीने करा स्वत:चं संरक्षण
‘या’ 4 राशींना आज मोठा आर्थिक फटका बसणार, बोलण्यावर ताबा ठेवा!
नताशाने ‘एक्स’ बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप का केला? बॉयफ्रेंडने सांगितलं यामागचं कारण
अमिताभ बच्चनने पत्नीबद्दल केलं अत्यंत मोठे विधान, म्हणाले, कायमच…
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवा ही 3 झाडे, पडेल पैशांचा पाऊस