Gold-Silver Rate Today | या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरात चढउताराचे सत्र दिसून आले. आज 29 जूनरोजी मात्र, ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. जून महिन्यात सोन्याच्या किमती जवळपास 4,000 रुपयांनी घसरल्याचं दिसून आलं. मात्र, आज किमतीमध्ये पुन्हा वाढ झाली. म्हणजेच महिन्याच्या शेवटी सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत.
चांदीचे भाव सध्या स्थिर आहेत. 24 जून रोजी सोने 150 रुपयांनी स्वस्त झाले. 25 जूनला भावात बदल झाला नाही. 26 जूनला 230 रुपये, 27 जून रोजी 270 रूपयांनी भाव उतरले. तर या आठवड्याच्या शेवटी भाव 450 रुपयांनी वाढला.
सोने-चांदीचे आजचे दर
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA),आता 22 कॅरेट सोने 66,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,330 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही.
26 जूनला चांदीमध्ये 1000 रुपयांची घसरण झाली. गेल्या दोन दिवसांपासून भावात बदल दिसला नाही. आज सकाळच्या सत्रात मात्र घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो (Gold-Silver Rate Today) चांदीचा भाव सध्या 90,000 रुपये आहे.
कॅरेटचा भाव काय?
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोने 71,835 रुपये, 23 कॅरेट 71,547 रुपये, 22 कॅरेट सोने 65,801 रुपये झाले. 18 कॅरेट 53,876 रुपये, 14 कॅरेट सोने 42,024 रुपये प्रति 10 ग्रॅमवर (Gold-Silver Rate Today) पोहचले आहे.
घरबसल्या जाणून घ्या भाव
दरम्यान, तुम्ही सोने आणि (Gold-Silver Rate Today) चांदीच्या किंमती घरबसल्या पण जाणून घेऊ शकता. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
News Title : Gold-Silver Rate Today 29 june 2024
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्यातील ‘या’ भागात घडली धक्कादायक घटना! 14 वर्षांच्या मुलानं अनेकांना टँकरनं उडवलं
एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल; ‘या’ दिवसापासून द्यावे लागणार जास्त पैसे
1 जुलैनंतर सिम पोर्ट करणे होणार अत्यंत अवघड, अन्यथा बसू शकतो लाखोंचा दंड
या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात यश मिळणार
Diabetes रुग्णांसाठी जांभूळ एक वरदानच; जाणून घ्या याचे फायदे