Gold-Silver Rate Today | लग्नसराईच्या या हंगामात मौल्यवान धातू सोन्यात सध्या चढउताराचे सत्र दिसून येत आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्यात घसरण दिसून आली. सोने-चांदीच्या चढउताराचा ग्राहकांच्या खिशांवर चांगलाच परिणाम होतोय. लवकरच भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे. त्यात व्याजदरमध्ये कपात होणार की वाढ होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण, या सर्व धोरणांचा परिणाम हा सोने-चांदीच्या किमतींवर सुद्धा दिसून येतो. (Gold-Silver Rate Today)
गेल्या आठवड्यात सोन्यामध्ये 1 हजारांची दरवाढ नोंदवली गेली. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याच्या किमतीमध्ये 650 रुपयांची घसरण झाली. त्यात 22 आणि 24 कॅरेटच्या सोन्याचा भाव खाली उतरल्याचे दिसून आले. तर काल 2 डिसेंबर रोजी पुन्हा 650 रुपयांनी सोने वधारले. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळाले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,005 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77, 500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या पंधरा दिवसांत चांदीने देखील मोठी आघाडी घेतली आहे. गेल्या आठवड्यात चांदीमध्ये 2500 रुपयांची घसरण दिसून आली. तर या आठवड्याच्या अखेरीस त्यात 2 हजारांची दरवाढ दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार एक किलो चांदीचा भाव हा 91 हजार रुपये इतका आहे. (Gold-Silver Rate Today)
14 ते 24 कॅरेटचा भाव-
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,308, 23 कॅरेट 76,002, 22 कॅरेट सोने 69,898 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,231 रुपये, 14 कॅरेट सोने 44,640 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )
सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)
News Title – Gold-Silver Rate Today 3 December 2024
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर एकनाथ शिंदेंची नाराजी दूर?; आज खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता
राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी?, संभाव्य नावे समोर
आज विनायक चतुर्थी, बाप्पा ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!
“त्यांच्यामुळे माझं लग्न…”, लग्नाबद्दल प्राजक्ता माळीचा नवा खुलासा
‘दिलंय तर दाखवा’; अभिनेत्रीच्या बिकिनीतील फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ